Skip to content
Manoj Deshmukh
All poems

कविता · मराठी

भेट

By Manoj Deshmukh
भेट

तोच सागर किनारा तोच थंडगार वारा तोच खडक भिजला मीही तसाच एकला जगू कसा मी एकटा कशी गेलीस सोडून नाते युगाचे आपले एका क्षणात तोडून माझे मन ते मासुळी तुझ्या प्रेमाच्या जाळ्यात पाणी भरतीचे आले काय माझ्याच डोळ्यात दूर धावत येणारी कशी किनाऱ्याला लाट तिला पाहून स्मरली तुझी पहिली ती भेट तुझे पार धुंद होणे मजकडे ते येताना वाट विसरून जाणे पुन्हा परत जाताना का संपला सहवास आता सुखाला आहोटी स्वप्ने कोमेजली माझी गाणे विरहाचे ओठी

Read next