समूहास या कसे मानव म्हणावे पिसाळलेले मग दानव म्हणावे काय दोष होता त्या गर्भिणीचा किती जीव छोटा असे त्या भ्रूणाचा जन्मा आधी अस्तित्व खोडले तू किती क्रूर झाला पोट फोडले तू भुकेल्या जीवाला दाता वाटलं रे निष्पाप पशूचा तू गळा घोटला रे खून हत्तीणीचा लागेल धरेच्या जिव्हारी प्राक्तन भोगण्या आता ठेव तू तयारी
