वाटला मला ज्यांचा आधार होता मांडला कसा त्यांनी बाजार होता भांडलो मनाचे मी ओतून सारे बोलले तुझा मुद्दा बेकार होता भीत मी नकाराला मौनात गेलो आज हे कळाले की होकार होता साज ना कधी केला, होती तशी ती फूल एक वेणीचे शृंगार होता बोलला तसे केले काहीच नाही केवढा पदासाठी लाचार होता वाटला मला ज्यांचा आधार होता मांडला कसा त्यांनी बाजार होता
