Skip to content
Manoj Deshmukh
All poems

कविता · मराठी

पाहता वळून मागे...

By Manoj Deshmukh
पाहता वळून मागे...

पाहता वळून मागे दिसते गर्दी चूकांची सोडून मोती ते सारे केली वेचणी फुकांची डोळे भरून हिरवा नाही पाऊस पाहिला आतून सूर लावत नाही मल्हार गायिला जोडून छंद नवखे कुठे स्वानंद शोधला अर्थार्जनात केवळ तो मी आनंद शोधला मी जाऊन मंदिरात ना अहंकार सांडला देऊन दान भक्तीचा कसा बाजार मांडला इवलेच पोट माझे हे उशिराच कळाले क्षण अनमोल सारे हतातूनी ते गळाले

Read next