चला वादळाला विनंती करूया तुझे वागणे ते चुकीचेच आहे घरे दाखवू ती किती मोडलेली तुझा क्रोध होणे चुकीचेच आहे कसे बांधले हाय जोडून काडी असे नष्ट होणे चुकीचेच आहे तसे वागलो पाप झाले खरे रे दुराचार होणे चुकीचेच आहे कसे लावता झाड छाया मिळाली न हेही कळावे चुकीचेच आहे अशी लेकुरे या धरेचीच आम्ही न प्रेमास द्यावे चुकीचेच आहे धरा माय आहे कळाले जनासी तिचा नाश होणे चुकीचेच आहे क्षमा मागतो हात जोडून आम्ही न माफीस द्यावे चुकीचेच आहे
