Skip to content
Manoj Deshmukh
All poems

कविता · मराठी

चिऊताई

By Manoj Deshmukh
चिऊताई

चिऊताई चिऊताई येशील का? खिडकीत बसून गाशील का? जाळीत पिकली करवंद रानमेवा मला तू देशील का? उडतेस कशी तू आकाशी गुपित मला हे सांगशील का? काडी ला काडी जोडते कशी घरट्यात घेऊन जाशील का? गोड गोड खाऊ देईल तुला माझ्याशी मैत्री करशील का?

Read next