लिहिणे कविता त्याने सोडले आहे आत्ताच लेखणीला मोडले आहे लिहायचा पानभर अक्षरे अक्षरे दौतेला शाईच्या फोडले आहे विसरला गणगोत हे छंद मात्रांचे त्या जिवलग शब्दांना खोडले आहे चुकीचेच होते अंदाज नात्यांचे ग्रीष्मात पावसाने झोडले आहे परक्यास हे कशाला दोष ते द्यावे आपल्याच लोकांनी तोडले आहे झटकून टाक आता मनोज उदासी नाते थेट तयाशी जोडले आहे
