Skip to content
Manoj Deshmukh
All poems

कविता · मराठी

जाता येता कधीतरी...

By Manoj Deshmukh
जाता येता कधीतरी...

सहज तिने ते मला पहावे, जाता येता कधीतरी पाहताच मग गोड हसावे, जाता येता कधीतरी बघता बघता श्रावण सरला, पाऊस हा आला नाही वीजे सह ते ढग बरसावे , जाता येता कधीतरी डोक्यावरचे दही विकाया, म्हातारी आरोळी दे भाव न करता सारे घ्यावे, जाता येता कधीतरी मंदिराच्या दारा मध्ये, तो देव बसुनी भिक मागतो कधी त्यालाही भोग द्यावे, जाता येता कधीतरी गावाकडचा रस्ता आजही, खड्डया मधून वाटेचा मंत्र्यास त्या धक्के बसावे, जाता येता कधीतरी वृद्धाश्रमात आई सोडली, झालेली म्हातारी गाडी मधुनी त्याने यावे , जाता येता कधीतरी जाणे येणे सुरूच येथे, मुक्ती देईल सुटकरा परतूनी ना येणे व्हावे, जाता येता कधीतरी

Read next