मी कुठे करतो कविता ती तिचीच होत असते मी सरळ सरळ पाहतो ती वळुन येत असते मी आठवतो दिस नवा ती तेंव्हा रात असते मी चाचपडतो शब्दात ती मंजुळ गात असते मी झोपेतच अर्धवट ती लख्ख पाहत असते मी गण वृत्त बंधनात ती छंदात नहात असते मी लोकेषणा शोधत ती मी-वर मात असते मी नश्वर संपणारा ती इथेच राहत असते
