Skip to content
Manoj Deshmukh
All poems

कविता · मराठी

कसा वागतो मी

By Manoj Deshmukh
कसा वागतो मी

कसा वागतो मी भांबावलेला जरासा भरूनी ओसांडलेला कुणी काय केले चेटूक ऐसे असा वाटतो मी संचारलेला असा एकटा मी बेधुंद चाले जरी मार्ग आहे अंधारलेला नभी चंद्र येता हे काय झाले किनारा कसा हा फेसाळलेला पुरे जाहला हा मुक्काम आता बरे आज गाशा गुंडाळलेला

Read next