Skip to content
Manoj Deshmukh
All poems

कविता · मराठी

प्राजक्ताची फुले

By Manoj Deshmukh
प्राजक्ताची फुले

हळूवार वेच ती प्राजक्ताची फुले रानपाखरे वेलीवरती घेती तेथे झुले मधुर गोजिरी होते किलबिल तुझ येण्याची देती चाहूल प्राजक्त ही मग बहरून येतो शुभ्र फुलांची रास घालीतो केस मोकळे शुर्भ वसने पायावर ते अलगत बसणे फुल फुलाशी घेते वेचून असेच मजला वाटे पाहून चोरुन घेई गंध नेटका अंगणी वाहे वारा अवखळ प्राजक्ताचा गंध सुगंधी की आसे तो तुझाच दरवळ

Read next