जपल्या अजुनी वहीच्या मधुनी तूं दिलेल्या लाल पाकळ्या शुष्क पाकळ्या तरी गंध न सरला नात्या मधला बंध न सरला अलगद उडता वहीचे पाने स्मृती उजळल्या पुन्हा नव्याने कशी विसरवी रम्य ती घटका फूल पाडिले वेणीस देऊन झटका फुल उचलले मी ते अलगद मित्र सोबती त्यांच्या नकळत शाळेला ते लवकर जाणे एकटक अन् तुला पाहणे करुनी रोज ते नवे बहाणे घरा समोरून तुझ्या येणे जाणे बघता बघता दिन ते सरले स्वप्न रम्य ते परके ठरले जुन्या स्मृतींना येता भरती जपून ठेवली वही माळ्यावरती
