Skip to content
Manoj Deshmukh
All poems

कविता · मराठी

तुझ्या मधला तू...

By Manoj Deshmukh
तुझ्या मधला तू...

कुढत कुढत, रडत रडत जे काही करशील रे.. खालून फुटल्या भांड्यामध्ये पाणी कसे भरशील रे..? हसत हसत, आत घुसत जीव ओतून जे करशील रे.. मनासारखं होईल सार आभाळ कवेत भरशील रे.. मनात घेऊन एकच ध्यास जेव्हा झोप तुझी उडेल रे.. नशीबही मग देईल साथ हवं तसच घडेल रे.. तुझ्या मधला तूच अडसर हे सूत्र जेव्हा कळेल रे.. अवघड सार तेही जमेल यश मागे पळेल रे..

Read next