कल्पना करा, एका छोट्याशा स्वयंपाकघरात काम सुरु आहे. मोजकेच डबे, मोजकेच लोक. कुणालाच कसलाही गोंधळ होत नाहीये. पण हळूहळू स्वयंपाकघर मोठं होतं, नवनवीन जिन्नस येतात आणि काम करणाऱ्यांची संख्याही वाढते.
गोंधळ होऊ नये म्हणून एक शक्कल लढवली जाते— प्रत्येक डब्यावर 'लेबल' लावायचं! सुरुवातीला यामुळे काम खूप सोपं होतं. पण हळूहळू एक विचित्र गोष्ट घडू लागते... लोक डब्यात खरंच काय आहे हे तपासण्याऐवजी, फक्त 'लेबल' वाचूनच स्वयंपाक करू लागतात.
परिणाम? एखाद्या दिवशी साखरेचं लेबल असलेल्या डब्यात मीठ निघतं, तर कधी छानसं चकचकीत लेबल लावलेला डबा आतून पूर्ण रिकामाच निघतो! आणि मग लक्षात येतं की, आत 'जिन्नस' (Content) नसेल किंवा चुकीचे असेल, तर त्या बाहेरच्या आकर्षक 'लेबल'चा काहीही उपयोग नाही.
corporate आणि आजच्या शिक्षण व्यवस्थेत नेमकं हेच होत नाहीये का?
आजच्या जगात आपले Degrees, Qualifications आणि Certifications म्हणजे हे डब्यांवरचे 'लेबल्स' झाले आहेत. आणि आपले Skills, Knowledge आणि Problem Solving Capability म्हणजे डब्यातला 'जिन्नस' (Content)!
आजकाल आपण फक्त कागदोपत्री 'लेबल' मिळवण्याच्या मागे एवढे धावतोय की, आतला 'कंटेन्ट' वाढवण्याकडे आपले दुर्लक्ष होत आहे.
लेबल्स गरजेचे आहेत का? नक्कीच! जसं डब्याला लेबल असणं गरजेचं आहे, तसंच संधी मिळवण्यासाठी क्वालिफिकेशन महत्त्वाचं आहे.
पण ते पुरेसे आहेत का? अजिबात नाही. जर तुमच्याकडे प्रत्यक्ष काम करण्याची कौशल्ये नसतील, तर त्या सर्टिफिकेटला शून्य किंमत आहे.
आज इंडस्ट्रीमध्ये अनेक असे 'रिकामे डबे' पाहायला मिळतात, ज्यांच्यावर मोठमोठ्या सर्टिफिकेशन्सची लेबल्स आहेत, पण जेव्हा प्रत्यक्ष प्रोजेक्टवर काम करण्याची वेळ येते, तेव्हा त्यांच्याकडे आवश्यक 'कौशल्य' (Skills) नसते.
थोडक्यात सांगायचे तर... फक्त रेझ्युमेवर लावण्यासाठी लेबल्स गोळा करू नका. स्वतःला आतून समृद्ध करा. तंत्रज्ञानाची आणि कामाची सखोल समज मिळवा. कारण मुलाखतीच्या वेळी कंपनी कदाचित तुमचे 'लेबल' पाहील, पण नोकरीत टिकून राहण्यासाठी आणि प्रगती करण्यासाठी तुमचा 'कंटेन्ट' (क्षमता) च कामी येणार आहे!
तुम्हाला काय वाटतं? तुमच्या आजूबाजूला किंवा कामाच्या ठिकाणी असे 'फक्त लेबल असलेले पण आतून रिकामे असलेले डबे' बघायला मिळतात का? तुमचे अनुभव कंमेंट्स मध्ये नक्की सांगा! 👇
First published on Facebook.
