आपल्यापैकी बहुतेकांनी 'Who Moved My Cheese?' हे पुस्तक वाचलेलं आहे. या पुस्तकातील संदेश (टेक अवे) खालील प्रमाणे होता :
👉 बदल हा अटळ आहे (Change is constant) 👉 बदलाचा अंदाज घ्या आणि जुळवून घ्या (Anticipate & Adapt) 👉 भीतीवर मात करा (Overcome fear) 👉 जुन्या गोष्टी सोडा (Let go of the old)
आज २०२६ AI मुळे बदलणाऱ्या परिस्थिती मध्ये तर या पुस्तकातील संदेश आणखी रेलेवंट होत आहे.
📊 आकडे काय सांगतात? (Economic Times | १७ जानेवारी २०२६) देशातील मोठ्या ५ IT कंपन्यांनी गेल्या ९ महिन्यांत मिळून फक्त Net १७ कर्मचारी वाढवले आहेत.
मागील १५-२० वर्षाचा आढावा घेतला तर मागील वर्षीपेक्षा चालू वर्षात IT कंपन्यांची एकूम एम्प्लॉयी संख्या काही हजाराने वाढायची. पण मागील ९ महिन्यात एकूण वाढलेला एम्प्लॉयी काउन्ट हा केवळ १७ आहे.
🌍 नेटक्याच झालेल्या दावोस येथील World Economic Forum अजय बंगा (जागतिक बँकेचे अध्यक्ष) आणि नंदन निलेकणी (इन्फोसिसचे सह-संस्थापक) यांच्या मुलाखतीत खालील एक महत्वाचा मुद्दा मांडला गेला आहे:
पुढील १५ वर्षांत १.२ अब्ज तरुण नोकरीच्या शोधात असतील.
पण औपचारिक नोकऱ्या (Formal Jobs) फक्त ४० कोटीच तयार होतील.
❓ उरलेले ८० कोटी लोक काय करणार?
🤖 कदाचित इथे AI येतो… पण केवळ AI ला दोष देऊन चालणार नाही ! AI ने तुमचं 'चीज' (नोकरी/संधी) हलवलं नाहीये, त्याने फक्त आपल्याला इशारा दिलाय की—जुना मार्ग आता चालणार नाही.
मग 'Who Moved My Cheese?' चा धडा आज कसा लागू होतो?
🧀 बदल अटळ आहे (Change is Constant): IT क्षेत्रातील 'Mass Hiring' चा (हजारोंच्या संख्येने होणारी भरती) काळ आता संपत चालला आहे.
🧀 अंदाज घ्या आणि जुळवून घ्या (Anticipate & Adapt): आता केवळ एकच स्किल किंवा एकच भूमिका आयुष्यभर पुरेशी नाही.
🧀 भीतीवर मात करा (Overcome Fear): "सरकारी किंवा मोठ्या कंपनीतली सुरक्षित नोकरी" (Secure Job) हा गैरसमज आता सोडावा लागेल.
🧀 जुन्या विचारांना निरोप द्या (Let Go of the Old): केवळ मोठ्या कंपनीची नोकरी म्हणजे 'यश', हा जुना विचार आता बदलावा लागेल.
💡 निष्कर्ष : AI हा तितका धोका नाही. तर खरा धोका आहे—बदल न स्वीकारण्याचा. जे लोक वेळेत शिकतील, स्वतःमध्ये बदल करतील आणि तंत्रज्ञानाचा वापर करून स्वतःची नवी दिशा ठरवतील, त्यांच्यासाठी संधींची कमतरता नाही.
❓ तुमचं काय मत आहे? चीज (संधी) तर हलली आहे… पण तुम्ही अजून जुन्याच जागी अडून बसणार आहात का? की नवीन संधी शोधायला बाहेर पडला आहात?
कमेंटमध्ये तुमचं प्रामाणिक उत्तर नक्की द्या. 👇
#Career #WhoMovedMy Cheese #AI #ITJobs #AjayBanga #NandanNilekani #MarathiPost #FutureOfWork #SkillUp #PudheKai
First published on Facebook.
