Skip to content
Manoj Deshmukh
All Marathi essays

मराठी निबंध · मे 2026 · २ मिनिटे

AI 'मिडल-मॅन' संपवतोय का?

By Manoj Deshmukh
AI 'मिडल-मॅन' संपवतोय का?

गेल्या काही काळातील टेक इंडस्ट्रीवर नजर टाकली, तर एक वास्तव समोर येतंय:

Meta → ८,००० नोकऱ्या Oracle → ३०,००० नोकऱ्या Cloudflare → १,१०० नोकऱ्या

एकूण ४०,००० नोकऱ्या. पण या कंपन्या तोट्यात आहेत का? नाही! उलट Meta चे उत्पन्न लाखांच्या कोटीत आहे, Oracle चा नफा वाढतोय आणि Cloudflare ची कामगिरी अपेक्षेपेक्षा सरस आहे.

मग हे नक्की काय चाललंय? या तिन्ही दिग्गज CEO चा सूर एकच आहे:

Cloudflare चे Matthew Prince: "जे लोक केवळ माहितीचे विश्लेषण आणि रिपोर्टिंग करत होते, ते काम आता AI क्षणार्धात करतोय."

Meta चे Zuckerberg: "कमी मनुष्यबळ + AI = ज्या कामासाठी पूर्ण डिपार्टमेंट लागायचं, ते आता काही हातांतून शक्य आहे."

Oracle चे Larry Ellison: "भविष्यातील AI इन्फ्रास्ट्रक्चरसाठी लागणारी गुंतवणूक उभी करण्यासाठी हा बदल अनिवार्य आहे."

थोडक्यात सांगायचं तर — "मध्यस्थ" (The Middle-Men) बाद होत आहेत.

AI मुळे खालील भूमिकांमधील माणसांची गरज आता वेगाने कमी होतेय: ❌ Middle Management: जे केवळ मीटिंग्स आणि समन्वयात वेळ घालवायचे. ❌ Reporting Roles: जे फक्त डेटा गोळा करून वर पाठवायचे. ❌ Admin/Auditing: जे केवळ प्रक्रियेचे (Process) पालन करायचे. ❌ Legacy Teams: जे कालबाह्य उत्पादने सांभाळत होते.

ही लाट फक्त टेक कंपन्यांपुरती मर्यादित राहणार नाही. बँका, विमा, सरकारी कार्यालये, शिक्षण संस्था आणि हॉस्पिटल्स... जिथे जिथे "प्रोसेस-ओरिएंटेड" किंवा "मध्यस्थी" काम आहे, तिथे हा बदल अटळ आहे.

काय केले पाहिजे?

स्वतःला एकच प्रश्न विचारा: "माझ्या कामात अशी कोणती गोष्ट आहे, जी AI कधीही करू शकत नाही?"

जर उत्तर सापडत नसेल, तर आजच नवीन कौशल्ये (Skill-sets) आत्मसात करायला सुरुवात करा.

जर उत्तर सापडले असेल, तर ते कौशल्य इतके धारदार करा की AI लाही ते मागे टाकता येणार नाही.

AI मुळे नोकऱ्या जात आहेत हे वास्तव असले, तरी नवीन संधीही तितक्याच वेगाने तयार होत आहेत. "माझ्या नोकरीला काही धोकाच नाही" असा आंधळा आशावाद किंवा "नोकऱ्या संपल्या" अशी अवास्तव भीती, या दोन्ही टोकांच्या भूमिका घेण्यापेक्षा; आपल्या कामावर AI चा काय परिणाम होऊ शकतो, हे ओळखून नवीन स्किल्स आत्मसात करणे, हीच आजच्या काळातील 'प्रॅक्टिकल' बुद्धिमत्ता आहे!

💬 तुमच्या कामात असं कोणतं स्किल आहे, जे AI रिप्लेस करू शकत नाही? कमेंट्समध्ये सांगा, मला तुमच्या अनुभवातून जाणून घ्यायला आवडेल!

First published on Facebook.

Read next