Skip to content
Manoj Deshmukh
All Marathi essays

मराठी निबंध · मे 2026 · २ मिनिटे

सोशल मीडियावरील १०K 'फ्रेंड्स' विरुद्ध खऱ्या आयुष्यातील 'तो' १ माणूस!

By Manoj Deshmukh
सोशल मीडियावरील १०K 'फ्रेंड्स' विरुद्ध खऱ्या आयुष्यातील 'तो' १ माणूस!

🤔

भारत एक समाज म्हणून जगातील सर्वात उत्तम आणि भक्कम समाज व्यवस्थांपैकी एक आहे. आपल्याकडे रक्ताच्या नात्यांपेक्षाही असे अनेक हक्काचे मित्र किंवा शेजारी असतात, ज्यांच्यासाठी आपण काहीही करायला तयार असतो आणि त्यांच्याकडून तितकीच मदतही मिळवू शकतो. कदाचित याच भक्कम आणि एकमेकांत विणलेल्या सामाजिक व्यवस्थेने भारताला कोरोनासारख्या भीषण काळातही तारले असेल!

पण आज 'विकसित भारताच्या' वेगाने होणाऱ्या प्रवासात, कुठेतरी ही कौटुंबिक आणि सामाजिक रचना जरा कमकुवत होत चालली आहे का? असा प्रश्न पडतोय.

जर तुमचे वय १६ वर्षांपेक्षा अधिक असेल, तर खालील सुधारित चेकलिस्ट (Checklist) वाचताना तुम्हाला तुमच्या आयुष्यात त्या एका विशिष्ट व्यक्तीची (किंवा किमान १-२ व्यक्तींची) आठवण येते का? शांतपणे विचार करून स्वतःलाच हे प्रश्न विचारा:

त्याला तुम्ही रात्री-अपरात्री, कोणत्याही कारणाशिवाय किंवा कामाशिवाय सहज फोन करू शकता? 📞

तुम्ही त्याला आधी कोणतीही पूर्वकल्पना न देता (कळवल्याशिवाय) थेट त्याच्या घरी जाऊ शकता? 🏠

पैशांची अडचण असो वा इतर काही, तुम्ही त्याला अगदी हक्काने मदत मागू शकता? 🤝

तुमचे छोटे-मोठे अपयश, चुका किंवा आयुष्यातील गुपिते कोणतीही लाज वा भीती न बाळगता त्याला सांगू शकता? 😔

आयुष्यातील एखादा चुकीचा निर्णय किंवा संकट आल्यावर, "तो मला सांभाळून घेईल" असा विश्वास तुम्हाला त्याच्यावर आहे? 🛡️

कोणताही महत्त्वाचा किंवा कठीण निर्णय घेण्याआधी तुम्ही त्याचे मत आवर्जून घेता? 🗣️

तुम्ही त्याला हक्काने शिव्या देऊ शकता किंवा त्याच्या हक्काच्या खाऊ शकता? 🤗

तुमच्या यशात तुमच्यापेक्षा जास्त आनंद होणारा आणि तुमच्या दुःखात डोळ्यात पाणी येणारा तो एक माणूस तुमच्याकडे आहे? 🥹

मित्रांनो, जर हे प्रश्न वाचताना तुमच्या नजरेसमोर किमान १ ते २ व्यक्तींची नावे येत नसतील, तर आज आपल्याला आपल्या 'सामाजिक बुद्धिमत्तेवर' (Social Intelligence) काम करण्याची गरज आहे!

आज आपल्याकडे इन्स्टाग्रामवर लाखो व्ह्यूज असतील, फेसबुकवर हजारो फ्रेंड्स असतील आणि व्हॉट्सॲपवर शेकडो ग्रुप्स असतील... पण खऱ्या आयुष्यात सुख-दुःख वाटून घ्यायला हक्काची माणसे उरलेली नाहीत. मजबूत नाती आणि सामाजिक बुद्धिमत्ता ही एका रात्रीत तयार होत नाही, त्यासाठी सोशल मीडिया स्क्रोल करण्याऐवजी खऱ्या माणसांमध्ये वेळ आणि विश्वासाची गुंतवणूक करावी लागते.

या वीकएंड ला स्क्रीनचा वेळ कमी करून, हे प्रश्न वाचताना ज्या मित्राची किंवा व्यक्तीची तुम्हाला आठवण आली असेल, त्याला आजच फोन करा किंवा थेट भेटायला जा!

तुम्हाला काय वाटते? कमेंट्समध्ये तुमचे विचार नक्की सांगा. 👇

First published on Facebook.

Read next