काल मी माझ्या मॅकबुकवर सिस्टीम सॉफ्टवेअर अपडेट करत होतो. बराच वेळ झाला तरी नवीन ऑपरेटिंग सिस्टीम व्हर्जन अपडेटच होत नव्हतं, कारण कॉम्प्युटरमध्ये पुरेशी जागा (Space) शिल्लक नव्हती. 'जागा कुठे गेली?' म्हणून मी सिस्टीम तपासू लागलो आणि अचानक माझं लक्ष गेलं ते Trash (रिसायकल बिन) कडे. पाहतो तर काय... तिथे अनेक जुन्या, मोठ्या आणि नको असलेल्या फाईल्स साठून राहिल्या होत्या.
शिकायला मिळालेली पहिली गोष्ट: आपण फाईल 'डिलिट' केली तरी ती जोपर्यंत रिसायकल बिनमध्ये असते, तोपर्यंत ती सिस्टीममधील जागा व्यापूनच ठेवते. जोपर्यंत तिथून ती 'Permanently Delete' होत नाही, तोपर्यंत नवीन अपडेटसाठी जागाच तयार होत नाही!
हे करत असताना मला अचानक एक खूप मोठा प्रॅक्टिकल विचार आला... आपल्या मनाचंही असंच काहीसं असतं ना?🤔
आपल्या मनातही अशा अनेक 'डिलिटेड फाईल्स' वर्षानुवर्षे साठलेल्या असतात. भूतकाळातील एखादा कटू अनुभव, कोणाचे तरी टोचणारे शब्द, जुने अपयश किंवा जुने राग-रुसवे... आपल्याला वाटतं की आपण हे सगळं सोडून दिलंय (Delete केलंय), पण नकळत आपल्या सबकन्शियस मनात (Subconscious Mind) त्यांनी खूप मोठी जागा व्यापून ठेवलेली असते.
आपलं मन बॅकग्राउंडला त्याच फाईल्स प्रोसेस करत असतं आणि त्यामुळे आपली मानसिक ऊर्जा आणि शांतता नको तिथे खर्च होत असते.
जर आयुष्यात काहीतरी नवीन 'अपडेट' हवं असेल, नवीन ऊर्जा आणि सकारात्मकता हवी असेल, तर आपल्याला आपल्या मनाची 'रिसायकल बिन' सुद्धा अधूनमधून पूर्णपणे 'Empty'करावीच लागेल! 🗑️✨
जुन्या निरुपयोगी गोष्टी मनातून कायमच्या काढून टाकल्याशिवाय, नव्या विचारांचे आणि आनंदाचे 'सॉफ्टवेअर' आपल्या आयुष्यात नीट इन्स्टॉल होऊच शकत नाही. चला तर मग, या वीकेंडला लॅपटॉपसोबतच आपल्या मनाची 'Space' सुद्धा थोडी मोकळी करूया! 🚀
तुम्हाला काय वाटतं? आपणही नकळत मनात अशा फाईल्स साठवून ठेवतो का? कमेंट्समध्ये तुमचे विचार नक्की सांगा! 👇
First published on Facebook.
